वर्धा : शास्त्रीय कला, चित्रकलेत प्रावीण्य व लोककला प्रकारात सहभागी दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येतात. याबाबतचे प्रस्ताव स्वीकारण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा – विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास अटक

हेही वाचा – नागपूर : संपात सहभागी झालेल्या २१९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

प्रस्ताव स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी होत होती. त्यानुसार ८ फेब्रुवारी २०२३ अशी नवी मुदत मिळाली. मात्र, या मुदतीत काही तांत्रिक कारणास्तव माध्यमिक शाळांना गुणवाढीचे प्रस्ताव सादर करणे शक्य झाले नाही. परिणामी, पात्र विद्यार्थी या गुणांपासून वंचित ठरणार होते. हे घडू नये म्हणून बुधवारी सायंकाळी राज्य शिक्षण मंडळाने वाढीव मुदत जाहीर केली आहे. प्रस्ताव २० मार्चला सायंकाळपर्यंत सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुढे वाढीव मुदत मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. संपात सहभागी शिक्षक व मुख्यध्यापक यांनाच हे प्रस्ताव सादर करायचे असल्याने ते काय भूमिका घेणार ही औत्सुक्याची बाब ठरते.

Story img Loader