लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : दक्षिण मध्य रेल्वेने सुरू केलेल्या आठ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. त्यात अकोला मार्गे धावणाऱ्या दोन रेल्वेचा समावेश आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळात आहे. त्यामुळे या गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

आणखी वाचा-महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसला प्रतिसाद वाढला, डबे कमी केल्याचा सकारात्मक परिणाम

या मार्गावरील अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. ०७०५३ काचीगुडा – बिकानेर विशेष गाडी दर शनिवारी ०२ ते ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. ०७०५४ बिकानेर-काचीगुडा विशेष गाडी दर मंगळवारी ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत धावेल. ०७११५ हैदराबाद-जयपूर सुपरफास्ट विशेष गाडी दर शुक्रवारी ०१ ते २९ सप्टेंबरपर्यंत धावेल. ०७११६ जयपूर- हैदराबाद सुपरफास्ट विशेष गाडी दर रविवारी ०३ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबरदरम्यान धावणार आहे. या गाड्यांना मिळालेल्या मुदतवाढीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of eight trains of south central railway ppd 88 mrj