चंद्रपूर : खरेदी केंद्रांची मोजकी संख्या, इंटरनेट नेटवर्कची समस्या, अवकाळी पावसाचे वातावरण, यामुळे धान नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

हेही वाचा – सायबर गुन्हेगाराकडून ११ लाखांनी फसवणूक, पाच दिवसांत पती पत्नीचे बँक खाते रिकामे

Vishwa Marathi Sammelan 2025
Vishwa Marathi Sammelan 2025 : अनोख्या उपक्रमाला पुणेकरांचा प्रतिसाद; तीन दिवसांत ३५ हजार पुस्तकांचे आदान-प्रदान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shivraj Rakshe Mahendra Gaikwad
पंचांशी हुज्जत, लाथ मारणं भोवलं! शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर कुस्तीगीर परिषदेची मोठी कारवाई
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Loksatta explained Why and how much did milk collection increase
विश्लेषण :राज्यात दुधाचा महापूर?
subhash sharma padma shri award
नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांना ‘पद्मश्री’, यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच…
Arbitrator hearing on objections of 1062 farmers in Naina area
नैना क्षेत्रातील १०६२ शेतकऱ्यांच्या हरकतींवर लवादाकडून सुनावणी
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?

हेही वाचा – यवतमाळ : नवीन वीज मीटरसाठी ४५ हजारांची लाच! वीज वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ अडकला

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी आहेत. आधारभूत योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून शेतकरी धानविक्री करतात. या जिल्ह्यांमध्ये केंद्रांची संख्या मोजकी आहे. अनेक दुर्गम गावांमध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचाही तडाखा विदर्भाला बसत आहे. अशात शेतकऱ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता धान नोंदणीची मुदत वाढविण्यात यावी, असा आग्रह मुनगंटीवार यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली व पत्रही दिले. याची दखल घेत भुजबळ यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. त्यानुसार धान नोंदणीची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे.

Story img Loader