अकोला : प्रवाशांचा प्रतिसाद आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेकडून ओखा-मदुराई, सूरत-ब्रह्मपुर (ओडिसा) विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या दोन गाड्या जानेवारी अखेरपर्यंत धावतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदाबाद, भुसावळ, अकोला, नांदेड, काचीगुडा, रेणीगुंटा, तिरुचिरापल्ली मार्गे धावणारी गाडी क्रमांक ०९५२० ओखा – मदुराई साप्ताहिक विशेष गाडीला ०१ ते २९ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९५१९ मदुराई-ओखा साप्ताहिक विशेष गाडीला ५ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भुसावळ, अकोला, वर्धा, वारंगल, विजयवाडा, विजयनगरम मार्गे धावणारी ०९०६९ सूरत – ब्रह्मपुर साप्ताहिक विशेष गाडीला १७ ते ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ब्रह्मपुर – सुरत साप्ताहिक विशेष गाडीला १९ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा – अकोल्यात नववर्षात करोनाचा धोका, सक्रिय रुग्णसंख्येत वाढ; ‘जेएन-१’ बाधित रुग्णाच्या प्रकृतीबाबतचे अपडेट जाणून घ्या….

हेही वाचा – उत्पादन कमी तरीही सोयाबीनला चांगला दर मिळेना! विकावे की प्रतीक्षा करावी? शेतकरी विवंचनेत…

हैदराबाद – जयपूर विशेष गाडीची फेरी रद्द

भोपाळ विभागातील संत हिरडाराम नगर-निशातपुरा दरम्यानच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम व निशातपुरा स्थानकावर ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम सुरू आहे. त्यामुळे ३८ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात अकोला मार्गे धावणाऱ्या हैदराबाद – जयपूर एक्सप्रेस विशेष गाडीचा समावेश आहे. गाडी क्रमांक ०७११५ हैदराबाद – जयपूर एक्सप्रेस विशेष १२ जानेवारी रोजी हैदराबाद स्थानकावरून रद्द केली आहे. गाडी क्रमांक ०७११६ जयपूर – हैदराबाद एक्सप्रेस विशेष १४ जानेवारी रोजी जयपूर स्थानकावरून रद्द केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension of these special trains due to overwhelming response from passengers ppd 88 ssb