वर्धा : राज्यातील कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील नऊ अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी ९ जुलै ही अंतिम मुदत होती. आता त्यासाठी आणखी सात दिवस देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना २६ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. राज्य सामायिक प्रवेश कक्षातर्फे ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या नऊ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२ हजार ६९० जागा राज्यात उपलब्ध आहेत. आता अर्ज सादर करण्यास १६ जुलै, तात्पुरती गुणवत्ता यादी २० जुलै, हरकती व तक्रारी २१ ते २३ जुलै, हरकतींची यादी प्रसिद्ध २५ जुलै, अंतिम गुणवत्ता यादी २७ जुलै, पहिल्या फेरीची निवड यादी २९ जुलै असा कार्यक्रम आहे.