वर्धा: गुणवंत शिक्षकांना आपल्या कार्याचे मूल्यमापन होवून त्याचा गौरव व्हावा,अशी सुप्त इच्छा असते. तीच इच्छा पूर्ती शासनाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार देत केल्या जाते. राष्ट्रीय पातळीवर शिक्षण मंत्रालयातर्फे असे पुरस्कार दिल्या जातात. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ जुलै होती. ती आता ७ ऑगस्ट करण्यात आली आहे.
जुन्या वेळापत्रकानुसार नोंदणी १५ जुलै, २५ जुलै पर्यंत राज्यस्तरीय समितीकडे, २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत अर्जाची छाननी होणार होती. छाननी नंतर केंद्राच्या पोर्टलवर अपडेट झाल्यानंतर ४ व ५ ऑगस्टला शिक्षकांच्या मुलाखती होणार होत्या. पण आता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नवे वेळापत्रक जाहीर होईल.
शिक्षकांनी शालेय शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे जीवनस्तर वाढविण्यासाठी केलेल्या कार्याचे फोटो, ऑडियो,व्हिडिओ, इतर कागदपत्रे, विविध भेटी अहवाल आपल्या अर्जासोबत जोडायच आहे. किमान दहा वर्ष सेवा झालेले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच संस्था प्रमुख पुरस्कारासाठी पात्र ठरतील.