अमरावती: दिवाळी सणानिमित्‍त प्रवाशांची अतिरिक्‍त गर्दी लक्षात घेऊन मध्‍य रेल्‍वेने अमरावती-पुणे आणि बडनेरा-नाशिक दरम्‍यान उत्‍सव विशेष मेमू रेल्‍वेगाड्या चालविण्‍याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडी क्रमांक ०१२०९ विशेष मेमू अमरावती येथून ५ ते १९ नोव्‍हेंबरदरम्‍यान दर रविवारी आणि बुधवारी १२.४० वाजता सुटेल तसेच पुणे येथे दुसऱ्या दिवशी २.४५ वाजता पोहोचणार आहे. गाडी क्रमांक ०१२१० विशेष मेमू पूणे येथून ६ ते २० नोव्‍हेंबर दरम्‍यान दर गुरूवारी आणि सोमवारी ०६.३५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे ०७.५० वाजता पोहोचणार आहे. या गाडीला अमरावती, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन, उरळी, हडपसर आणि पुणे येथे थांबा देण्‍यात आला आहे.

हेही वाचा… नागपूरमध्ये व्हीव्हीआयपींच्या दौ-यानिमित्त कोट्यवधींची कामे

गाडी क्रमांक ०१२११ विशेष मेमू बडनेरा येथून ६ ते १९ नोव्‍हेंबरदरम्‍यान दररोज ११.०५ वाजता सुटेल आणि नाशिक येथे त्‍याच दिवशी १९.४० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०१२१२ विशेष मेमू नाशिक येथून ६ ते १९ नोव्‍हेंबरदरम्‍यान दररोज ९.१५ वाजता सुटेल आणि बडनेरा येथे दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड आणि नाशिक स्‍थानकावर थांबा देण्‍यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extra rush due to diwali central railway has decided to run special memu trains between amravati pune and badnera nashik mma73 dvr
Show comments