प्रशांत देशमुख

वर्धा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेबाबत आयोजकांनी कमालीची गोपनीयता ठेवत काम केले. ही स्मरणिका विदर्भाचा एक संग्राह्य दस्तावेज ठरेल, अशी खात्री मात्र मिळते. नागपूरच्या बनहट्टी मुद्रणालयात त्यावर अखेरचा हात फिरविणे सुरू आहे. आयोजकांपैकी दोन प्रमुख त्यासाठी ठाण मांडून बसले आहे.

स्मरणिकेचे मुखपृष्ठ छायाचित्र देण्यास त्यांनी नम्र नकार दिला. प्राप्त माहितीनुसार, या स्मरणिकेत महानुभाव साहित्य, सत्यशोधक चळवळ, वैदर्भीय वृत्तपत्रसृष्टी, शिलालेख, अरण्यवाचन, कामगार साहित्य, झाडीबोली, अचलपूरची नाट्य परंपरा, संत परंपरा, शेतकरी चळवळ, प्राचीन शिल्प, सहकार, आंबेडकरी चळवळी व अन्य विषयावर विदर्भाच्या अनुषंगाने लेख आले आहेत. डॉ. तीर्थराज कापगते, डॉ. परशुराम खुणे, अजय कुलकर्णी, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. श्रीपाद जोशी व अन्य मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. स्मरणिकेच्या एकूण पाच हजार प्रती छापण्याचा निर्णय झाल्याचे समजते. विविध विषयासाठी हा संदर्भ ग्रंथ ठरेल, अशी खात्री संपादक मंडळातील एकाने दिली. आज रात्रीपर्यंत सर्व प्रती वर्धेत पोहोचतील, असे सांगितले जात आहे.

Story img Loader