नागपूर : उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कॉंग्रेसमधून निलंबित माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. देशमुख हे पुन्हा भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी

देशमुख यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. आता फडणवीस स्वतः देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. ते शुक्रवारी सावनेरमध्ये होते. तेथील कॉंग्रेसचे आमदार
सुनील केदार यांच्या विरोधात भाजपा देशमुख यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – गुंतवणूकदारांची ७ कोटी ६५ लाखांनी फसवणूक; राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालकासह चौघांना अटक

देशमुख सावनेरमधून लढण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचे देशमुख यांच्याकडे भेट देणे महत्त्वाचे मानले जात आहे. २०१४ मध्ये देशमुख भाजपाकडून यापूर्वी काटोलमधून लढले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. पण फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्याने ते काँग्रेसमध्ये गेले. त्यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.