नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा समृद्ध होईल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. बहुप्रतीक्षित नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल.

हेही वाचा- नागपूर: अखेर ‘त्या’ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निलंबनाचे आदेश निघाले

नागपूर-शिर्डी या ५२० किमीच्या टप्प्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल. उर्वरित टप्पा ६ महिन्यात पूर्ण होईल. यामुळे नवीन इकॉनिमिक कॅरिडॉर तयार होईल व त्याचा. विदर्भ, मराठवाडा या मागास भागाला होईल, असे फडणवीस म्हणाले. ते उद्या( रविवारी) महामार्गाची पाहणी करणार आहे. तसेच हा दौ-याच्या तयारीचा आढावा घेतील. एकूण ७०० किमीचा हा प्रकल्प आहे.

हेही वाचा- उदयनराजेंच्या राज्यपालांविरोधातील भूमिकेचे संजय गायकवाडांकडून समर्थन; म्हणाले, “शिवरायांबाबतच्या वक्तव्यांमुळे…”

मुंबईला विदर्भाशी जोडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती.२०१५ ला या मार्गाचे काम सुरू झाले. जवळपास ७०१ किलोमीटरचा हा मार्ग असून तो १० जिल्ह्यातून जाणार आहे. २०१९ पर्यंतच तो पूर्ण होणार होता. यापूर्वी दोन वेळा तारीख जाहीर होऊनही ऐनवेळी लोकार्पण रद्द करण्यात आले होते.

Story img Loader