यवतमाळ : स्पर्धा परीक्षेत सतत येत असलेल्या अपयशाने खचून जात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुसद येथे उजेडात आली. धनश्री मधुकर राठोड (२३) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पुसद येथील श्रीरामपूर परिसरातील बावणे लेआउटमधील धनश्री राठोड ही तरुणी पदवीधर होती.  ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. तिने अनेक परीक्षा दिल्या. मात्र स्पर्धा परीक्षेत यश न आल्याने नैराश्यातून राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी धनश्रीला येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुसद उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. धनश्रीच्या पश्चात पोफाळी पोलीस ठाण्यात जमादार असलेले वडील मधुकर राठोड, आई उषा, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.