लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : सायबर गुन्हेगारांकडून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे फेसबुकवर बनावट अकाऊंट बनवून लोकांकडून पैशाची मागणी करण्याचे प्रकार घडत आहेत.

सायबर गुन्हेगारांनी यावेळी चक्क पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचेच बनावट फेसबुक अकाऊंट बनवले. त्यांच्या काही मित्रांना संदेश पाठवून पैशांची मागणी केली. यापूर्वी, २०२१ आणि या वर्षी जुलैमध्ये सायबर गुन्हेगारांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमारचे बनावट खाते बनवल्यानंतर असाच प्रकार घडला होता. मात्र, त्या अकाऊंट तयार करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

आणखी वाचा-संतापजनक! मित्राच्या अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाच्या बनावट अकाऊंटवरून सायबर गुन्हेगारांनी पाठवलेला संदेश एका व्यक्तीला मिळाल्यानंतर ही घटना समोर आली. त्या व्यक्तीने पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. सायबर गुन्हेगारांनी आयुक्त कुमार यांच्या अनेक फेसबुक मित्रांनी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवल्या होत्या.

…होय माझ्या नावाचे बनाव खाते

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी फेसबुक अकाऊंटवरून एक मेसेज शेअर केला, ‘माझ्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले असून आरोपीने माझा प्रोफाईल फोटो आणि कव्हर फोटो वापरुन लोकांना फसवण्याच्या प्रयत्न करीत आहे. या बनावट अकाऊंटवरून आलेल्या संदेशाला उत्तर देऊ नका किंवा कोणताही व्यवहार करू नका, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.