लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा औद्योगिक वसाहतीत सुरू असलेल्या बनावट खत कारखान्याचा कृषी विभागाच्या भरारी पथकाने भांडाफोड केला. धाड टाकून आठ लाखांचा खताचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात कारखान्याच्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तेल्हारा येथे संशयास्पदरित्या कृषी निविष्ठा निर्मिती होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. भरारी पथकाने तेल्हाऱ्यातील औद्योगिक वसाहत परिसरात तपासणी केली. नामदेव अग्रो अशा नावाने राहुल सरोदे यांच्याकडून येथे खत निर्मिती केली जात असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे दस्तऐवजाची मागणी केली असता त्यांनी माहिती सादर केली नाही. त्यानंतर पंच व पोलिसांसमक्ष पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली. खत उत्पादकाचा कुठलाही वैध परवाना नसतानाही उत्पादन सुरू होते. परिसरात ‘ग्रॅन्यूलर फॉर्म’मध्ये ‘एसएसपी’ व ‘डीएपी’ खत मोकळ्या अवस्थेत पडले होते. तेथेच ‘ग्रॅन्युलर फॉर्म’च्या ५६७ पिशव्या होत्या. त्यावर मैदा, आटा, ‘युपीएल’ असे नमुद केले होते. याशिवाय ‘एन पॉवर ग्रॅन्युलर’ नाव असलेल्या नामदेव ॲग्रो उत्पादीत ३० पिशव्या मोकळ्या अवस्थेत दिसून आल्या.

आणखी वाचा-नागपूर: ‘व्हिडिओ लाईक्स’चे आमिष; सायबर गुन्हेगाराच्या टोळीला अटक, ४५ लाख जप्त

घटनास्थळी आढळलेला आठ लाख पाच हजार ९५० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. खताचे नमुने पंचासमक्ष घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. याठिकाणी निर्मिती कृषी निविष्ठासाठी विक्रीबंद आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने तेल्हारा पोलीस ठाण्यात बनावट खत निर्मिती कारखान्याच्या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी कारखान्याचे संचालक राहुल नामदेव सरोदे यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी भादंवि कलम ४२०, रासायनिक खते (नियंत्रण) आदेश १९८५ कलम सात, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम तीन (दोन) (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुका स्तरीय भरारी पथकाचे तेल्हारा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र राठोड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण, तेल्हारा मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत आदींच्या पथकाने केली.