नागपूर: महामेट्रोत नोकरी लावून देतो असे सांगत पैसे घेण्याचे प्रकार घडत आहेत. एकीकडे असे प्रकार होत असतानाच आता QR कोड स्कॅन करत किंवा लिंकच्या माध्यमाने पैसे भरल्यास महामेट्रोत नोकरी मिळते, असा दावा करणारा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा कुठल्याही पद्धतीने नागपूर मेट्रोत नोकरी मिळत नसून या बद्दल नोकरी करता प्रयत्न करणाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन नागपूर मेट्रोने केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकरीच्या नावावर फसवणुकीचे प्रकार नागपुरात होत असल्याचे चित्र आहे. आजवर या संबंधाने शहराच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्याची नोंद देखील झाली आहे. असे प्रकार होत असतानाच आता फसवणुकीच्या या नवीन प्रकारापासून सर्वांनी सावध असावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा… खळबळजनक! लॉजवर प्रेयसीसोबत घालवली रात्र; सकाळी प्रियकर मृतावस्थेत सापडला

काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमाने मोबाईलवर लिंक पाठवून सुरक्षा रक्षक पदावर नोकरी देण्याकरता व्हेरिफिकेशनसाठी १ हजार रुपये व गणवेशाकरिता ५५०० रुपये भरण्याकरिता व्हॉट्सॲप द्वारे चुकीचे प्रलोभन दिले जात आहे.

हेही वाचा… पावसाचे हे चालले तरी काय? आत्ताच आला आणि आत्ता पुन्हा विश्रांती

मेट्रोच्या पदभरती संबंधीची सर्व माहिती महा मेट्रोची वेबसाईट http://www.mahametro.org व प्रतिष्ठित वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित केल्या जाते. त्यामुळे पदभरती संबंधी कुठलीही माहिती मिळाल्यास याची संपूर्ण शहानिशा महामेट्रोची संकेतस्थळ किंवा मेट्रो भवन कार्यालयातून करावी तसेच टोल फ्री क्रमांक: १८००२७००५५७ वर संपर्क साधावा असे आव्हान महा मेट्रो, नागपूर तर्फे नागरिकांना केले जात आहे.