लोकसत्ता टीम

नागपूर: चौघांनी आपल्याच मित्राची बनवाबनवी करून लुटमार करण्याची योजना आखली. चौघापैकी दोघे तोतया पोलीस तर दोघे तोतया चोर बनले. दोन चोरांचे हात बांधून दोन पोलीस मित्राच्या कार्यालयात पोहचले. कार्यालयात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करीत मित्राकडून २ लाख रुपये लुटले. कुणालाही सांगितल्यास अटक करण्याची धमकी देऊन निघून गेले. हा प्रकार धंतोली पोलिस ठाण्याअंतर्गत घडला. धंतोली पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून मित्राने रचलेल्या चोर-पोलिसांचा डाव उधळून लावला. अनिकेत वानखेडे (२२) आणि सचिन वैद्य (२३) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर अनिल टेकाम आणि अनिल जाधव या दोघांचा शोध सुरू आहे.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी फिर्यादी मृदुल सुपसांडे (२२) हा धंतोली परिसरात गजानननगर येथे ऑनलाईन रिचार्ज एजंट म्हणून कामाला आहे. तेथेच त्याचा मित्र मोबीन चौधरी हा सुध्दा काम करतो. मृदुलकडे रोख रक्कम असते याची माहिती आरोपी अनिकेत आणि सचिनला होती. त्यांनी मृदुलला लुटण्याची योजना आखली. योजनेप्रमाणे दोघांनी पोलीस तर दोघांनी चोराची भूमिका बजावली. त्यासाठी पोलिसाची वर्दीही खरेदी केली.

आणखी वाचा-खबरदार! कमी वयात दुचाकी चालवल्यास पंचविसव्या वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना नाही

मृदुल आणि मोबिन हे दोघेही कामावर असताना मृदुलचा मित्र अनिकेत आणि सचिन या दोघांचेही हात चोराप्रमाणे दोरीने बांधून आणले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच दोघेही पोलिसांप्रमाणे वागणूक करीत होते. तोतया पोलीस अनिल टेकाम आणि अनिल जाधव यांनी तोतया चोर अनिकेत आणि सचिनला मारहाण केली. कशासाठी त्यांना मारहाण करता अशी विचारणा मृदुलने केली त्याला दमदाटी करीत ‘तुम्ही येथे मोबाईल हॅकींगचे काम करता’ असे म्हणत त्याला मारहाण करून क्युआर कोडवरुन युपीआय आयडी खात्यावरून दोन लाख रुपये स्वत:च्या बँक खात्यात वळविले आणि याबाबत कोणालाही सांगितल्यास अटक करण्याची धमकी दिली.

असे फुटले बींग

पोलिसांनी अटक केलेले मित्र अनिकेत आणि सचिनला सोडविण्यासाठी मृदूलने त्यांना फोन लावला. दोघांनीही त्याला पोलिसांनी सोडून दिल्याचे सांगून भेटण्यास टाळाटाळ केली. यावरून त्याला संशय आला. दरम्यान मृदुलने कुटुंबियांना झालेला प्रकार सांगितला तसेच पोलीस ठाणे गाठले. संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मित्रावर संशय असल्याने उलट तपासणी केली असता मृदुलचा मित्र अनिकेत, सचिन आणि अनिल टेकाम, अनिल जाधव यांनी संगणमत करून मृदुलची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. धंतोली पोलिसांनी अनिकेत आणि सचिनला अटक केली. दोघांचा शोध सुरू आहे.