लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : नागपूरसह देशभरात मध्यंतरी सोन्याच्या दरात वाढ होऊन ते २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार २०० रुपयापर्यंतच्या उंचीवर पोहचले होते. परंतु, हल्ली सातत्याने सोन्याच्या दरात घसरण होत आहे. ३ जून २०२४ रोजीच्या सोन्याचे दर आणखी खाली घसरले. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने बदल होण्याचा क्रम सुरू आहे.

नागपूरसह राज्यभरात सध्या लग्न समारंभाची रेलचेल मोठ्या प्रमाणात दिसते. या समारंभात वर- वधूला सोन्याचे दागिने घेतले जातात. त्यामुळे हल्ली नागपुरातील सराफा व्यवसायिकांकडे गर्दी वाढली आहे. सोन्याचे २० मे २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार २०० रुपये प्रति दहा ग्रामपर्यंतच्या विक्रमी उंचीवर पोहचले होते. परंतु, आता हे दर घसरत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा-भंडारा : डॉ. प्रशांत पडोळे म्हणतात, ‘एक्झिट पोल’ जनतेचा नसून भाजपप्रणित, केवळ सायकॉलॉजिकल वारफेअर…’

नागपुरातील सराफा बाजारात ३ जून २०२४ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७२ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ६७ हजार, १८ कॅरेटसाठी ५६ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ८०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९० हजार ५०० रुपये होते. हे दर २७ मे २०२४ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रामसाठी ७२ हजार ४००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार ३००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार १०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९० हजार १०० रुपये होते.

नागपुरात २० मे २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार २००, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ९१ हजार ७०० रुपये होते. त्यामुळे नागपुरात सातत्याने सोन्याचे दर अधून- मधून वाढत असले तरी त्या तुलनेत हल्ली घसरण जास्त बघायला मिळत असल्याचे चित्र आहे. दर सतत कमी होत असल्याने दागिने खरेदीचा बेत असलेल्या कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा-अकोला : भाजपचा वर्चस्वाचा दावा; काँग्रेस व वंचितला परिवर्तनाची आशा, उमेदवार म्हणतात…

सोने खरेदीची चांगली संधी

नागपुरातील सराफा व्यावसायिकांच्या माहितीनुसार, सध्या सोन्याचे दर कमी झाली असले तरी आंतराष्ट्रीय बाजारातील स्थिती बघता सोने- चांदीचे दर लवकरच पून्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या या धातूचे दागिने खरेदीची चांगली संधी आहे. जर खरेदीला विलंब केल्यास दास्त दहाने ते खरेदी करावे लागण्याची शक्यता आहे.