स्वच्छ भारताच्या मोहिमेला रेल्वेचा हरताळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
स्वच्छ भारत अभियानात रेल्वेचाही समावेश असला तरी रेल्वे प्रवाशांना विदर्भ एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात उष्टे अन्न आणि दुर्गंधीला सामोरे जावे लागले. नागपुरातून मुंबईकडे गाडी रवाना होण्यापूर्वीच या बाबीकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, डब्याची स्वच्छता होण्यास पुलगावपर्यंत प्रवास करावा लागला.
गोंदिया ते नागपूर विदर्भ एक्स्प्रेसच्या एससी- २ बोगीमध्ये नागपुरातील काही प्रवासी चढले. त्यावेळीच डब्यातील स्वच्छतेची कल्पना प्रवाशांनी आली. त्यांनी तातडीने रेल्वे कंडक्टर यांना गाठून तक्रार केली. त्यांनी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिली. परंतु कोणीच डब्याची स्वच्छता करण्यास आला नाही. प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वेच्या स्वच्छता अभियानाची दुसरी बाजूही समोर आली. धामगावच्या जवळपास गाडी असताना सफाई कामगार आले. त्यांच्यावर कंडक्टर रागावले. परंतु २४ डब्यांच्या या गाडीत पाच सफाई कर्मचारी देखील नव्हते. कंत्राटदार जितेन माथूर यांच्याकडे या गाडीच्या सफाईची जबाबदारी आहे. माथूर यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कामगारांना वेतन दिले नाही. त्यामुळे अर्धे कामगार कामावर आले नाहीत. त्यामुळे गोंदिया येथून बसलेल्या प्रवाशांनी केलेली घाण रात्री आठ वाजेपर्यंत साफ करण्यात आली नव्हती. स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरात भलेही झळकत असतील, परंतु सफाई कामगारांना नियिमत वेतन मिळत नसल्याची बाब या निमित्ताने समोर आली. या डब्यातून झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटिव्ह कमिटी सदस्य सतीश यादव प्रवास देखील प्रवास करीत होते. नागपूर, वर्धा येथील एकूण नऊ सदस्य विदर्भ एक्सप्रेसने मुंबईला जात होते. त्यांनी स्वच्छतेबाबत तक्रारी केली. दुर्गंधी येत असल्याने जेवणाची इच्छा झाली नाही. तक्रारीनंतरही कित्येक तास सफाई झाली नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता चालवला आहे. त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. तसेच रेल्वेही या अभियानात अग्रेसर असल्याची जाहिरात केली. परंतु वास्तव आज आम्ही प्रवास करत असल्याने समोर आले आहे, असे सतीश यादव म्हणाले.