नागपूर : लग्नातील पोशाखावरून सुरू झालेल्या वादामुळे नवरी मुलीने नवरदेव मुलावरती हुंडा मागणे आणि बलात्कार करण्याची खोटी तक्रार दाखल केली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मध्यस्थी करत आरोपी मुलावरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. न्या. विनय जोशी आणि न्या.वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

तक्रारकर्ती मुलगी पुण्यातील एका कंपनीत कार्यरत आहे. तिने २१ एप्रिल २०२३ रोजी धंतोली पोलिस ठाण्यात मुलाविरोधात हुंडा मागणे आणि बलात्काराची तक्रार दाखल केली. त्या आधारावर पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल केला. याविरोधात मुलाने उच्च न्यायालयात धाव घेतली या मुलाची तक्रारकर्ती मुलीची फेसबुकच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२१ मध्ये ओळख झाली. या ओळखीचे प्रथम मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. मुलगा हा चंद्रपूरमध्ये कार्यरत होता तर मुलगी नागपूरमधून ‘वर्क फ्रॉम होम’ करत होती. फेसबुकवर ओळख झाल्यावर जानेवारी २०२२ मध्ये त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर दोघांनीही आपल्या कुटुंबियांना आपल्या प्रेमाबाबत माहिती दिली.

Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली

हेही वाचा…गडचिरोली: पोलीस- नक्षल चकमकीत कमांडर वासूसह दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान, घटनास्थळाहून मोठा शस्त्रसाठा जप्त

नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि ११ मे २०२३ ही लग्नाची तारीख निश्चित झाली. यानंतर लग्नासाठी पोशाखावर चर्चा करताना दोघांमध्येही भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी दोन्ही कुटुंबियांमध्ये बैठत पार पडली. तक्रारकर्त्या मुलीनुसार, या बैठकीत मुलाच्या आईने आणि बहिणीने लग्नात सोन्याची साखळी आणि चारचाकी वाहन देण्याची मागणी केली. आरोपानुसार, यावेळी दोन्ही पक्षात जोरदार वाद झाला. यानंतर दोघांमधील लग्न तोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा…उफ ये गर्मी! उकाडा सहन होईना, ताडोबातील वाघिणीचा बछड्यांसह पाणावठ्यात मुक्काम…

भांडणानंतर मुलाने मुलीद्वारा शिविगाळ केल्यामुळे पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस आणि नातेवाईकांच्या मध्यस्थीमुळे त्याने हा निर्णय मागे घेतला. याबाबत मुलीला माहिती मिळाल्यावर तिने मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर मुलाविरोधातील गुन्हा बदला घेण्यासाठी दाखल करण्यात आला असल्याचे मत व्यक्त करत गुन्हा रद्द करण्याचे आदेश पोलिसांना दिले.