नागपूर केवळ भारतात नाही तर विदेशात खाद्य संस्कृती ची ओळख करून देणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या बजाजनगरमधील विष्णू जी की रसोईची सुरुवात ही राष्ट्रगीताने सुरू होते. रसोई बंद होते ती सुद्धा राष्ट्रगीताने.केवळ १५ ऑगस्त किंवा २६ जानेवारीलाच नाही तर दररोज राष्ट्रगीत म्हटले जावे. अनेक वर्षापासून दररोज हा आगळावेगळा उपक्रम राबविला जातो. त्यात रसोई मधील कर्मचारी आणि तिथे आलेले लोक सहभागी होत असतात.
हेही वाचा >>>नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरही वाढीव प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा आदेश बेपत्ता!
रसोई मध्ये लग्न असो की कुठला समारंभ असो. राष्ट्रगीत सुरू झाले की रसोई मध्ये आलेले लोक आहे तिथे उभे राहून राष्ट्रगीत सुरू झाले की एका सुरात गातात. राष्ट्र गीताचा अपमान होऊ नये याची काळजी रसोई मध्ये घेतली जाते. भारत माता की जय असा जयघोष होतो आणि सर्व आपल्या कामाला लागतात.