नागपूर : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात दहा दिवसांच्या मुक्कामानंतर नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी तुळशीबाग येथील नागपुरच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली व कोराडी येथे मूर्ती विसर्जित करण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
यंदा नागपूर राजा येथील मंडळाने महापालिकेच्या आग्रहाप्रमाने चार फूट मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. नागपूर राजाच्या गणपतीची सकाळी ९ वाजता पूजन व आरती करण्यात आली. शहरातील विविध भागातील गणपती मूर्तीचे विसर्जन शहरातील विविध भागातील तलावाजवळ ठेवण्यात आलेल्या कृत्रिम टाकी मध्ये केले जात आहे. तर चार फुटापेक्षा अधिक उंच मूर्तीचे नागपूर पासून २० किमी अंतरावरील कोराडीच्या तलावात विसर्जन केले जात आहे.
First published on: 09-09-2022 at 14:20 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farewell nagpur cha raja drum immersion procession ysh