वर्धा : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या पुलगाव येथील दारूगोळा भंडारात जूने बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू आहे. त्यातील धातूचे तुकडे वेचताना योगेश केशव नेरकर या सव्वीस वर्षीय शेतमजुराचा दुर्दैवी अंत झाला. आज सकाळी नऊ वाजता ही घटना घडली.
गत काही दिवसांपासून हे काम सुरू आहे. परिसरातील सोनेगाव आबाजी, यासगव, केळपूर, जामनी येथील कामगार, शेतमजूर या कामास जातात. निकामी बॉम्ब खड्ड्यात पुरणे व त्याचा स्फोट करण्याचे काम सुरू असते. या भंगारातून जस्त, लोखंड व अन्य स्वरुपाचे धातू वेचल्या जातात. त्याची खरेदी काही ठेकेदार जागेवरच करतात. त्याची किंमत चांगली मिळत असल्याने अनेक बेरोजगार या मोहात पडतात.
हेही वाचा – नागपूर : प्राध्यापक भरती आणि पैसे लुटणारी बंटी – बबलीची जोडी! काय आहे प्रकार?
हेही वाचा – दोन मुलांची आई, सलग १८ वर्षे ठेवला संयम, अखेर ‘वर्दी’चे स्वप्न केले साकार
कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या कामात अनेक व्यक्ती पूर्वी जायबंदी झाले आहेत. आज मात्र एका युवकास आपले प्राण गमवावे लागले. मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धेला नेणार असल्याची माहिती सोनेगावचे सतीश दाणी यांनी दिली.