लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : बाळापूर तालुक्यातील टाकळी खुरेशी येथे अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार सायंकाळी घडली. पद्माकर आत्माराम घोगरे (५८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. टाकळी खुरेशी येथील पद्माकर घोगरे हे शेतात गुरे चारण्यासाठी गेले होते. पावसाला सुरुवात होताच त्यांनी झाडाचा आडोसा घेतला.

आणखी वाचा-बुलढाण्यात पावसाचे पुनरागमन; पाच मंडळात अतिवृष्टी

अचानक वीज कोसळल्याने पद्माकर घोगरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.