लोकसत्ता टीम
बुलढाणा : मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यामुळे मोताळा तालुक्यात खळबळ उडाली असून सणासुदीला मृताच्या परिवारावर संकट कोसळले आहे. मोताळा तालुक्यातील रिधोरा येथे आज, शुक्रवारी ही दुर्देवी घटना घडली. सुरेश शिवराम कळमकर ( ४०, रा. रिधोरा, ता. मोताळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
आणखी वाचा-बुलढाणा : तिघांचे बळी घेणारा फरार ट्रॅव्हल्स चालक गजाआड; तीन दिवसानंतर अडकला जाळ्यात
सुरेश कळमकर गावानजीकच्या आपल्या शेतात जात होते. यावेळी अचानक त्यांच्यावर मधमाशांनी भीषण हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना अत्यावस्थ अवस्थेत मोताळा व नंतर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कळमकर परिवारावर संकट कोसळले असून सणासुदीला रिधोरा गावावर शोककळा पसरली आहे.