बुलढाणा : बिबट्याच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार झाल्याची दुर्देवी घटना बुलढाणा तालुक्यातील गिरडा परिसरात घडली. यामुळे बुलढाणा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून दाट जंगल परिसरात शेती असलेल्या शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या घटनेचा विस्तृत तपशील मिळू शकला नाही. मात्र, घटनेची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. त्यानुसार सुनील सुभाष जाधव (३७ वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात जागीच ठार झालेल्या दुर्देवी युवा शेतकऱ्याचे नाव आहे. सुनील सुभाष जाधव हा बुलढाणा तालुक्यातील गिरडा या गावाचा रहिवासी आहे. गिरडा येथेच जाधव परिवाराची शेती आहे.
आज, गुरुवारी सुनील जाधव हा आपल्या गिरडा शिवार परिसरातील (बुलढाणा वनपरिक्षेत्राच्या गिरडा बिट मधील) शेतात काही कामासाठी गेला होता. शेतातील कामे आटोपून तो आपल्या शेताच्या बांधावर उभा होता. यावेळी अचानक एका बिबट्याने सुनील जाधव यांच्यावर झडप मारली व त्याला गोंधनखेड पर्यंत फरफटत नेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा >>> महायुतीला धक्का देत ‘एकला चलोरे’चा नारा; महादेव जानकरांची २८८ मतदारसंघात…
दरम्यान, जिवाच्या आकांताने आरडाओरड करणाऱ्या सुनील जाधव यांचा आवाज ऐकून त्याचा भाऊ घटनास्थळी धावून आला. इतरही गावकरी धावत आले. त्यामुळे अत्यावस्थ स्थितीतील सुनीलला जागीच सोडून बिबट्याने घनदाट जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, तोपर्यंत सुनील जाधवचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मृत सुनील चा भाऊ, गावकरी यांनी गिरडा बिटचे शिंदे यांना दिली. शिंदे यांनी घटनेची माहिती बुलढाणा वनक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांना दिली. आरएफओ अभिजित ठाकरे यांनी सहकऱ्यांसह घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळची पाहणी व पंचनामा केला. उपस्थित गावकरी, शेतकरी यांच्या समवेत चर्चा करून घटनेची माहिती जाणून घेतली.
हेही वाचा >>> वर्धा : ‘भाऊराया, बहिणीस विधानसभेसाठी संधी द्या’ -नितीन गडकरींना बहिणीची विनवणी…
यानंतर मृत सुनील सुभाष जाधव यांचा मृतदेह बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. संध्याकाळी उशिरापर्यंत शव विच्छेदनाची कार्यवाही सुरू होते. वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे हे आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होते. दरम्यान त्यांनी घटनेची प्राथमिक माहिती दिली. मृत सुनील जाधव यांच्या परिवाराला वन विभाग तर्फे शक्य ती मदत तातडीने देण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी ‘लोकसत्ता ‘सोबत बोलताना दिली. उद्या, शुक्रवारी, ३० ऑगस्ट रोजी सुनील जाधव याची पत्नी श्रीमती शीतल सुनील जाधव यांच्या बँक खात्यात पंचवीस लाख रुपयांची मदत जमा करण्यात येणार असल्याची पूरक माहितीही आरएफओ ठाकरे यांनी दिली.
अस्वलांची संख्याही लक्षणीय बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात गिरडा हे गाव येते. गिरडा, गुम्मी, तराडखेड आदी गावाना लागूनच दाट जंगल क्षेत्र आहे. यात बिबट्याचा अधून मधून संचार असल्याचे दिसून येते. अस्वलांची संख्या लक्षणीय आहे. प्रजनन काळात अस्वलांच्या हल्ल्याचा घटना घडतात. मात्र, बिबट हल्ल्याची घटना क्वचितच घडते.