मुल तालुक्यातील चिरोली येथे मंगळवारी सकाळी आठ वाजता पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात एकनाथ चुनारकर (७५) हा वृद्ध शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना घडली.एकनाथ चुनारकर हे शेती पाहण्यासाठी माठ नाल्याजवळ गेले होते. दरम्यान, नियत क्षेत्र कक्ष क्रमांक ७२० मध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने चुनारकर यांच्यावर हल्ला केला. यात ते जागीच ठार झाले. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एकीकडे, शेतीचे नुकसान तर दुसरीकडे जिवाची भीती, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडले आहेत. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
First published on: 11-10-2022 at 16:43 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer killed in tiger attack in chandrapur amy