चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्रील (बफर) बाम्हणगाव शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मंगळवारी बाम्हणगाव येथील शेतकरी धानाचे रोवणे संपल्याने शेताशेजारी असलेल्या जंगलालगत जनावरे चारत होते.
यावेळी वाघाने हल्ला करून ऋषी किसन देवतळे (६०) या शेतकऱ्याला ठार केले. एका आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष आहे.