गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या दिभना परिसरात शेतात आलेल्या रानटी हत्तींना जंगलाच्या दिशेने वळविण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याला रानटी हत्तीने सोंडेने उचलून खाली आपटले. त्यानंतर त्याला पायाखाली चिरडून ठार केले. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.होमाजी गुरनुले (५५, रा. दिभना) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

दिभनापासून दोन किमी अंतरावरील शेतशिवारात रानटी हत्ती आल्याची माहिती दिभना गावात मिळाली. त्यानुसार होमाजी गुरनुले हे अन्य एका शेतकऱ्यासोबत आपल्या शेतात रात्री ८ वाजताच्या सुमारास पीक संरक्षणार्थ व कळपाला जंगलाच्या दिशेने वळवण्यासाठी गेले होते. रानटी हत्तींना शेतातून जंगलाच्या दिशेने वळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु शेतात सर्वत्र हत्ती पसरले होते. कळपातीलच एका हत्तीने होमाजी गुरनुले यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी एका झाडाचा आडोसा घेतला परंतु चवताळलेल्या हत्तीने होमाजी यांना सोंडेने उचलून जागीच आपटले व त्यानंतर तुडविले. यात होमाजी गुरनुले हे जागीच ठार झाले तर सोबतचा शेतकरी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. दरम्यान, या भागात गेल्या आठवडाभरापासून रानटी हत्ती ठाण मांडून आहेत, पण, वन विभागाने योग्य ती सतर्कता बाळगली नाही. शेतकरीच हत्तींना जंगलाच्या दिशेने वाळविण्यासाठी गेले होते. त्यात एकाला जीव गमवावा लागल्याने वन विभागाच्या कारभारावर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Gadkari alleged that officials of forest department responsible for stopping development of gadchiroli district
गडचिरोलीच्या विकासकामांना वन विभागाचा सर्वात मोठा अडथळा : नितीन गडकरी
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ