लोकसत्ता टीम

बुलढाणा: ‘लोकसभे’पूर्वी स्वबळावर लढण्याची घोषणा करायची अन निवडणूक लागली तर तडजोड करून आपली जागा पदरात पाडून घ्यायची, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची नेहमीचीच भूमिका राहिली आहे. आताही त्यांनी तेच केले असून त्यात काहीच नवीन नाही, अशा शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर शरसंधान साधले.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
manoj jarange patil on babarao lonikar maratha voting statement,
“मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी” म्हणणाऱ्या बबनराव लोणीकरांवर मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, “त्यांना आता रस्त्यावर…”

मागील अनेक दिवसांपासून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात निर्धार परिवर्तन यात्रा करीत असलेल्या तुपकरांनी प्रसिद्धी माध्यमासोबत संवाद साधला. यावेळी तुपकर यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. आपल्या पदयात्रेला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला, मिळतोय. अगदी सामान्य माणूस आर्थिक मदत करून मी निवडणूक लढवावी असा आग्रह धरत असल्याचे ते म्हणाले. राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट आणि त्यांना हातकणांगले मतदारसंघात बाहेरून दिलेला पाठिंबा यावर विचारणा केली असता त्यांनी वरील शब्दात आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. दर पंचवार्षिकमध्ये ते ( शेट्टी) हेच करतात. निवडणूक जवळ आली की स्वबळाची भाषा बोलतात आणि नंतर वाटाघाटी करून आपली जागा पदरात पाडून घेतात.

आणखी वाचा- निवडणुकीत पैशाचा गैरवापर, आयकर विभाग म्हणतो येथे संपर्क साधा

मात्र यामुळे अनेक महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे मरण होते. मागील दोन निवडणुकीत माझ्या सोबत हेच झाले. त्यामुळे आता त्यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. आम्हाला काय करायचे ते आम्ही ठरवले आहे. यंदाची लोकसभा मी ताकदीने लढविणार आणि जिंकणार असा दावा तुपकरांनी केला.