गोंदिया : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता हळू हळू शिगेला पोहोचत आहे. गोंदिया-भंडारा लोकसभा क्षेत्रातून भाजपच्या वतीने खासदार सुनील मेंढे पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात त्यांचा ५ एप्रिल ला दिवसभर प्रचार सुरू होता अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करड येथे खासदार सुनील मेंढे प्रचारासाठी आले असता त्यांनी मागे दिलेल्या आश्वासनानुसार कृषी पंपांना १२ तास वीजपुरवठा का नाही ? या प्रश्नाला घेऊन त्यांना एक शब्दही बोलू दिले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्थानिक शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात मोठा गदारोळ करत सुनिल मेंढेना प्रचारासाठी अक्षरशः मज्जाव केला त्यामुळे अखेर त्यांना आल्यापावलीच गावातून प्रचार सभा न करताच परतावे लागले. हा मोठा आक्रोश आणि गावकऱ्यांचा संताप बघून पुन्हा एकदा सुनील मेंढेची गतवेळी जनतेशी झालेला दुरावा व निष्क्रियता समोर आली. येत्या १९ एप्रिल रोजी विदर्भात लोकसभेतील पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे गोंदिया भंडारा लोकसभा उमेदवार असलेले खा. सुनील मेंढे अर्जुनी मोरगाव तालुक्यात आपला प्रचार करीत आहेत.

हेही वाचा…विदर्भातील सर्वपक्षीय घराणेशाही, भाजपही मागे नाही

मात्र अर्जुनी मोरगाव तालुका हा खरीप न आणि उन्हाळी रब्बी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा तालुका असल्यामुळे येथे सिंचनासह विजेची सुविधा आवश्यक आहे. मात्र राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा करण्याची हमी दिल्यानंतर वास्तव्यात केवळ आठ तास वीजपुरवठा होत आहे आणि तोही अखंडित त्यामुळे सुरळीत व किमान १२ तास वीजपुरवठा निर्माण करू असं आश्वासन मागील वेळी खासदार सुनील मेंढे व त्यांच्या केंद्र व राज्यातील व सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना दिले होते, मधल्या काळात काही दिवस १२ तास वीजपुरवठा करून लगेच ५ दिवसानंतर पुन्हा ८ तासावरच आणून ठेवली त्यातही अनेक वेळा सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे.

हेही वाचा…सूजी म्हणते, ‘कोण खासदार, लोकसभा काय असतं…’, गडचिरोलीच्या दुर्गम भागातील भयाण वास्तव

या आठ तासांमध्ये शेतकरी आपलं शेत सिंचिन करून पिकांचे उत्पादन घेऊ शकत नाही त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी गावात प्रचारासाठी आलेल्या खा. सुनील मेंढेना कृषी पंपाच्या विज समस्येला घेऊन प्रचंड गदारोळ केला व प्रचाराशिवाय गावातून परतून लावल्याची घटना शुक्रवार ५ एप्रिल रोजी रात्री ९.३० दरम्यान घडली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील स्थानिक भाजप नेत्यांनी गावकऱ्यांना सध्या आचार संहिता चा कारण समोर करून समझविण्याचा प्रयत्न केला पण बोडदे करड येथील ग्रामस्थ कुणाची काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer prevented gondia mp sunil mendhe for campaigning in arjuni morgaon taluka bolde karad village over electricity supply sar 75 psg