यवतमाळ : राज्यातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी पिकांना भाव न मिळाल्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे. त्याचा फटका राज्यातील महायुतीच्या जवळपास ३० जागांना बसेल, असा दावा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.

विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघात ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कापूस, सोयाबीन अशा पिकांवर अवलंबून आहे. मागील तीन वर्षांत कापूस, सोयाबीनसह इतर नगदी पिकांच्या बाजारभावात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

Why change in sugar control order is needed after 58 years
साखर नियंत्रण आदेशात ५८ वर्षांनी बदलाची गरज का? नवीन तरतुदी काय आहेत?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Pola festival Yavatmal, Pola farmers Yavatmal,
यवतमाळ : “सोयाबीनले भाव नाही, त भाजपाले मत नाही!” शेतकऱ्यांचा पोळ्यात संताप…
uddhav thackeray latest marathi news,
“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
anganwadi workers 500 crores marathi news
अंगणवाड्यांमध्ये ५०० कोटींच्या छत्र्या, मेगाफोन खरेदीचा घाट
low price to mung, soybean, mung price,
सोयाबीननंतर मूगही कवडीमोल, राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती दर ?
Contract electricity workers strike warning risk of system collapse
कंत्राटी वीज कामगारांचा संपाचा इशारा, यंत्रणा कोलमडण्याचा धोका
Raj Thackeray, Gondia, Raj Thackeray on Badlapur,
“बदलापूरची घटना मनसे पदाधिकाऱ्यांमुळे उघड,” राज ठाकरे यांचा दावा

हेही वाचा…गोंदिया : ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण; मतदान प्रक्रिया दोन तास बंद

लागवड खर्चात झालेली वाढ आणि उत्पादनात आलेली घट, अशा दुष्टचक्रात शेतकरी फसला. कुटुंबाची जबाबदारी, आरोग्य व शिक्षणावर होत असलेला खर्च याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे. गेल्या १० वर्षात ग्रामीण भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मार्च २०१४ ते मार्च २०२४ या १० वर्षांत महाराष्ट्रात तब्बल ३२ हजार ८४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावाही किशोर तिवारी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मूळप्रश्न सोडविले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोदी सरकारवर रोष असल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी गेल्या १० वर्षांत सरकारकडून कोणतेच ठोस काम झाले नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. कृषी संकटाच्या मूळ प्रश्नावर भाजपाच्या जाहिरनाम्यात कोणतीही हमी नसल्याने भाजपवरील प्रेम प्रचंड प्रमाणात नाराजीमध्ये परिवर्तीत झाल्याचे दिसत आहे. तसेच निवडणुकीच्या प्रचारातसुध्दा पंतप्रधान कृषी व शेतकऱ्यांच्या विषयावर एकही शब्द बोलत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीमध्ये भर पडत आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा…नागपूर : मतदान केंद्रावर सापाने प्रवेश केला अन्…

या नाराजीमुळे महाराष्ट्रातील कमीत कमी ३० मतदारसंघात महायुतीला फटका बसण्याची शक्यता असल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे. शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट व शेतकरी आत्महत्यांवर तोडगा काढण्यासाठी भाजपने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, उत्पादन वाढीसाठी बियाणे, खत याबाबत धोरण आखावे, तरूणांना व्यावसायिक शिक्षणाच्या संधी द्याव्या, बचत गटांचे कर्ज माफ करावे, आदी उपाय केल्यास भाजप पराभवाच्या छायेतून बाहेर येईल, अन्यथा भाजपला यावेळी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा…तुतारी टोचाची की फुकाची? मतदारांना पडलेला प्रश्न अन् त्यावर शोधले मग ‘हे’ उत्तर

…तर काँग्रेसला चांगले दिवस

काँग्रेसने जाहिरनाम्यामध्ये हमीभाव हा घटनात्मक अधिकार देवू असे सांगितले व शेतकरी, आदिवासी, बेरोजगार, महिला, आरोग्य आदी घटकांबाबत सकारात्मक आश्वासन दिले. काँग्रेसने हे शब्द पाळल्यास महाराष्ट्रात मरणासन्न झालेल्या काँग्रेसला येथील शेतकरी चांगले दिवस आणतील, असा विश्वासही किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे.