लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर काही तासांमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांनी निर्णय घेतला. तात्काळ दखल घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांना ई-केवायसीकरिता १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांना काही शेतकरी बांधवाकडून निवेदन प्राप्त होताच त्यांनी मंत्र्यांना पत्र लिहिले. २०२३-२४ मधील अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पीक वाहून गेले. संपूर्ण शेत पाण्याखाली आले. अश्या परिस्थितीत नुकसान भरपाईसाठी पात्र असतानाही अडचण निर्माण झाली होती. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. आणि अपुऱ्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अवघड आहे, अश्याप्रकारचे निवेदन अनेक शेतकऱ्यांकडून मुनगंटीवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाले होते.

आणखी वाचा-काय द्याचं बोला! कनिष्ठ अभियंत्याच्या लाचखोरीमुळे गडचिरोली बांधकाम विभागातील टक्केवारीची चर्चा…

या सर्व निवेदनांची दखल घेऊन मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांकडे वेळ अपुरा असल्यामुळे ई-केवायसीकरिता मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. आपण या प्रक्रियेकरिता मुदतवाढ द्यावी, असे पत्र मुनगंटीवार यांनी मुदत व पुनर्वसन मंत्र्यांना लिहिले होते. मुनगंटीवार यांच्या पत्राची काही तासांतच दखल घेण्यात आली आणि ई-केवायसीकरिता १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुनगंटीवारांच्या तत्परतेमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात येणारी मोठी अडचण दूर झाली आहे.

२२ सराईत गुन्हेगार हद्दपार

जिल्ह्यात झालेला गोळीबार, पेट्रोलबॉम्ब हल्ला तसेच वाढत्या हिंसक घटनांची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ॲक्शन मोडवर आले असून गुन्हेगारांना हद्दपार करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. एकाच दिवशी तब्बल सहा सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले असून मागील सहा महिन्यांत तब्बल २२ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा-नागपूर : सुनेचे टोमणे असह्य, मुलाच्या संसारात विघ्न नको म्हणून आई-वडिलांनी सोडले घर; भरोसा सेलने…

शहरातील रघुवंशी वसाहतीत मनसेच्या अमन अंदेवार यांच्यावर झालेला गोळीबार, राजुरा येथे शिवज्योतसिंग देवल याची गोळीबार करून झालेली हत्या, बल्लारपुरातील कापड व्यापाऱ्यावर झालेला पेट्रोलबॉम्ब हल्ला, यामुळे चंद्रपूर शहर हादरून गेले होते. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. वतन लक्ष्मण ताटपेल्ली (३३) रा. घुग्घुस, करण अर्जुन नाईक (२४) घुग्घुस, रोहन रनधिर कंज्जर (२६) रा. जलनगर वार्ड, चंद्रपूर, नरेश रामबाग कंज्जरय (३७) रा. जलनगर, चंद्रपूर, महेंद्र आनंदराव ढुमणे (३८) रा. बापटनगर, चंद्रपूर, मोहम्मद शोहेब अब्दुल हासम (४३) रा. बिनबागेट, चंद्रपूर या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. आतापर्यंत २२ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.