वाशीम : आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हळद उत्पादक शेतकरी अडचणीत असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या हळदीला अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. शेजारील हिंगोली जिल्ह्यात हळदीला ७३०० रुपये दर असताना वाशीममध्ये केवळ ५७०० रुपये दर का? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करून सरकारचा निषेध व्यक्त केला.

एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव जाहीर करते, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल भावाने मालाची विक्री करावी लागत आहे. हळदीला चांगले दर मिळतील या आशेने वाशीम बाजार समितीमध्ये केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातून जवळपास तीन ते साडेतीन हजार क्विंटल हळद विक्रीस आलेली होती. मात्र, हळदीला केवळ ५ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती.

Loksatta vasturang Pune successful move in real estate sector
रिअल इस्टेट क्षेत्रात पुण्याची यशस्वी वाटचाल
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Mobile charger for five lakh, Seniors citizen cheated by cyber thieves, Seniors citizen cheated pune,
मोबाइल चार्जर पाच लाखांना, सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक
Applications of 12400 aspirants in 24 hours for CIDCOs Mahagrihmanirman Yojana
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी २४ तासांमध्ये १२,४०० इच्छुकांचे अर्ज
Diwali bonus for permanent employees but not for contract employees
कायमस्वरूपींना बोनस पण कंत्राटी मात्र वाऱ्यावर!
Three people from Ulhasnagar who sold stolen iPhones to customers arrested in Kalyan
चोरीचे आयफोन ग्राहकांना विकणारे उल्हासनगरमधील तीनजण कल्याणमध्ये अटकेत
BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
Protest of women in front of Bank of Maharashtra for not getting the benefit of Ladaki Bahin Yojana Yavatmal
लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळाल्याने महिलांचा संताप

हेही वाचा – नितीन गडकरींचे सहकुटुंब देवदर्शन; भक्तांसाठीही सहकार्याचा हात

पोलीस प्रशासन व बाजार समितीच्या वतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला ७३०० रुपये दर, रिसोड व इतर बाजार समित्यांमध्ये चांगले दर असताना वाशीम बाजार समितीमध्ये दर कमी का? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी ठाम होते. यामुळे लिलाव प्रक्रिया बंद करण्यात आली. सकाळपासूनच शेतकरी उपाशी पोटी आपला माल घेऊन बाजार समित्यांमध्ये आले असून, बाजार समित्यांमध्ये मात्र शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

शेतकऱ्याला सापत्न वागणूक का?

येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हळद उघड्यावर तर व्यापाऱ्यांची ओट्यावर होती. उघड्यावर हळद असल्याने उन्हामुळे हळदीला अत्यल्प दर मिळतो. त्यामुळे व्यापाऱ्यांचा ओट्यावर असलेला माल खाली करावा व शेतकऱ्यांचा माल ओट्यावर ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आठवड्यातील दुसरी घटना, शेतकऱ्यांमध्ये दहशत

शेतकऱ्याच्या नावाने मते मागणारे नेते कुठे?

अनेक नेते शेतकऱ्यांच्या नावाने केवळ राजकारण करतात. मात्र येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असता, यावेळी जिल्ह्यातील कुठलाच नेता, लोकप्रतिनिधी आला नसल्याने शेतकऱ्यांनी नेत्यांवर तीव्र रोष व्यक्त करून जय जवान, जय किसानच्या घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.