अकोला: अतिवृष्टीमुळे पीक विमा काढण्यात शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पीक विमा काढण्याच्या मुदतीला २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत एक रुपयांमध्ये पीक विमा योजना सुरू केली. पंचामृत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, आता पीक विमा काढण्यात शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा मोसमी पावसाचे उशिराने आगमन झाले. त्यातच आता अतिवृष्टी झाली. पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत नोंदणीची मुदत जाहीर केली आहे.

हेही वाचा… मेडिकलच्या विद्यार्थ्यांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळाले; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रशासनात खळबळ

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. वायर तुटल्याने इंटरनेट सुविधा बंद आहे. काही ग्रामीण भागात विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. अतिवृष्टीमुळे विविध तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन पीक विमा काढण्याचे कार्य ठप्प झाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. असंख्य शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित आहेत. शेतकरी संकटात असल्यामुळे शासनाने या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून ऑनलाइन पीक विमा काढण्यात २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार सावरकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers are facing technical difficulties in crop insurance ppd 88 dvr
Show comments