बुलढाणा : राज्यातील लाखो शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाने कोलमडून गेले. अवकाळी, गारपीट, प्रचंड नुकसान, पिकांना कवडीमोल भाव यामुळे बळीराजा चहुबाजूंनी संकटात सापडला आहे. अशा बिकट परिस्थितीत त्यांना मदत करण्याऐवजी राज्यकर्ते यात्रेवर गेले, अशी टीका ठाकरे गटाचे पश्चिम विदर्भ संपर्क नेते खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाही बचाव यात्रा काढण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिखली येथील स्वरांजली लॉन येथे सोमवारी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. व्यासपीठावर जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हा संघटिका जिजा राठोड, युवासेना जिल्हा प्रमुख नंदु कऱ्हाडे, प्रा. सदानंद माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खा. सावंत यांनी पक्ष संघटना, शाखा स्थापना, आदी विषयांवर मार्गदर्शन केले. याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकत सरकारवर टीका केली.

हेही वाचा – यवतमाळ: कारमधून आले अन् चाकूचा धाक दाखवून २५ टन साखरेचा ट्रकच घेऊन गेले…

हेही वाचा – “संजय राऊत यांचं डोकं फिरलंय!”, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची टीका; म्हणाले, “प्रभू रामचंद्र त्यांना..”

गावागावात जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देत शिवसैनिकांनी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवाहन खा. सावंत यांनी केले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करून शिवसैनिकांनी संघटनात्मक बांधणी घट्ट करावी, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers are in trouble and rulers are on a pilgrimage comment mp arvind sawant in buldhana district scm 61 ssb
Show comments