वर्धा : गोगलगाय एक मृदुकाय व गरीब म्हणून ओळख असलेला प्राणी. पण तेवढाच तो बहू पिकभक्षी असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढवितो. त्यात शंखी गोगलगाय तर आता फारच उपद्रवी ठरू लागत असल्याची स्थिती आहे. शंखीच्या पाठीवर एक इंच लांबीचे गोलाकार कवच असते. बहुतांशी त्या करड्या, हिरव्या काळपट रंगाच्या असतात. ही किड रात्रीच्या वेळी आक्रमक होते. पाने खाऊन छिद्रे पाडते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नवी रोपे, अंकुर, पिकांचे अवशेष यावर तिची उपजीविका चालते. पपई व झेंडूच्या रोपांवर तिचे प्रथम लक्ष जाते. कीटकनाशके फवारून नियंत्रण करण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी होत नसल्याचे म्हटल्या जाते. म्हणून सकाळी व सायंकाळी त्या वेचून काढण्याचा उपाय उत्तम. शेताचे बांध स्वच्छ ठेवावे. त्यामुळे गोगलगायींना लपण्यास व अंडी घालण्यापासून रोखता येते.

हेही वाचा : वर्धा : शहरपक्षी दिन! काय वैशिष्ट्य या दिवसाचे जाणून घ्या…

चिमट्याने त्या गोळा करीत साबणाच्या किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात सोडाव्या. या किडीच्या नियंत्रणासाठी पन्नास टक्के अनुदान देय आहे. प्रत्येक गोगलगाय दीडशे अंडी घालते. त्यामुळे त्वरित नियंत्रण प्रभावी ठरत असल्याचे कृषी विद्यापीठाचे सांगणे आहे.