वर्धा : Farmers and Bail Pola 2024 Celebration मुसळधार पावसाने खचलेला शेतकरी आता पोळ्यासाठी लागणारा बैलांचा साज महागल्याने घायकुतीस आल्याची स्थिती आहे. गत १० जुलैपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचून असल्याने पीक हातून जाण्याची चिन्हे आहे. त्यातच आता पोळा सण आला. कृषीप्रधान ग्रामीण संस्कृतीत बैलांचे पुजन करणारा हा अत्यंत महत्त्वाचा सण समजल्या जातो. बैलांचा साजशृंगार करीत त्याला गोडधोड खाऊ घालून मिरवणूकीत फिरवण्याचा हा सण प्रत्येक शेतकरी आवर्जून साजरा करतो. मात्र बाजारात बैलांचा साज यावर्षी १५ते २५ टक्क्याने महागल्याचे दिसून येते. तरीही बाजारात शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.

हेही वाचा >>> “असना” वादळामुळे सप्टेंबर महिना अतिवृष्टीचा..!

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

बैल सजविण्यासाठी लागणारे साहित्य महागल्याचे पाहून सर्जा राजाची जोडी सजविणार कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. कासरे व बाशींग जोडी दर्जानुसार अडीशे ते पाचशे रूपये भावात उपलब्ध आहे. वेसण ७५ ते १०० रूपयात मिळते. झुले १७५ रूपये, घुंगरू ४०० ते ५०० रूपये जोडी, मटाटे अडीशे रूपये असे वाढीव दर आहे. बैलांना रंगविण्यासाठी लागणारे ऑइल पेंट, झिले कागद, साधे रंग याचेही भाव आवाक्याबाहेर आहे. बैलांच्या शिंगाला विविधरंगी कागदांनी सजविले जाते. त्याचाही दर वाढला. दरवर्षी बैलजोडी असणारा प्रत्येक शेतकरी शेतीसाठी कर्ज काढले असतांनाही हातउसने पैसे घेत पोळा साजरा करतोच. मात्र यंदा चित्र बदलले.असे महागडे साहित्य शेतकरी कसे खरेदी करणार असा सवाल या सणाचे अभ्यासक अविनाश टाके उपस्थित करतात. किमान सजविण्याचे साहित्य माफक दरात उपलब्ध झाले पाहिजे. बैलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा हा सण प्रत्येक शेतकऱ्याला साजरा करता यावा म्हणून उपाय व्हावे अशी अपेक्षा टाके व्यक्त करतात.

हेही वाचा >>> वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; भंडारा जिल्ह्यातील घटना

यावर्षी जुन महिन्यात पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्या. जुलैपासून पाऊस सुरू झाला. आता ऑगस्टमध्येही सुरूच असून थांबण्याचे नाव घेत नाही. सुर्यप्रकाश न मिळाल्याने पीके पिवळी पडत आहे. पाणी साचल्याने सडत आहे. काही पीकांवर किडीचा प्रादुर्भाव सुरूही झाला. निंदन, फवारणी, डवरणी यात हातचा पैसा निघून गेला. सर्वत्र ओल्या दुष्काळाचे सावट असल्याचे बोलल्या जाते.

यावर शेतकरी साहित्य संमेलनाचे प्रेरक गंगाधर मुटे यांनी मार्मिक भाष्य केले आहे.

 ‘बैना ओ बैना, लाडाची बहिणा

लाडाच्या बहिणीला पंधराशे महिना

पंधराशे रुपयावर महागाईचा डोळा

सरकारी योजनांचा फुटला पोळा ‘