गोंदिया : येथील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजतापासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गोंदिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्था मर्या. चुटिया, गोंदिया यांनी खरीप हंगामाचे धान शेतकऱ्यांकडून खरेदी केले, विक्री केलेल्या धानाचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे थक्कीत चुकारे न मिळाल्याने संतप्त शेतकरी यांनी स्थानिक आमदार अपक्ष विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पैसे खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहणार, असा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

शेतकऱ्यांनी संपूर्ण सोमवारचा दिवस त्याचप्रमाणे रात्रसुद्धा आमदार यांच्या घरासमोर काढली आहे. तर मंगळवारी कुटुंबाला घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. सोमवारी दिवसभरात सहायक पणन अधिकारी, गोंदिया ग्रामीणचे तहसीलदार यांनी यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा केली. पण शेतकरी चुकारे त्यांच्या खात्यात जमा झाल्याशिवाय इथून हलायला तयार नाहीत. रात्री ११ वाजेपर्यंत त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरूच होते. या प्रसंगी रात्रीपर्यंत आमदार विनोद अग्रवाल, गोंदिया ग्रामीण तहसीलदार पठाण, बाजार समितीच्या सभापती भाऊराव उके, संचालक पप्पू पटले, गोंदियाचे पोलीस उपविभागीय अधिकारी ताजने, शहर पोलीस निरीक्षक सूर्यवंशीसह पोलीस दलाची मोठी कुमक घटनास्थळी उपस्थित होती.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray statement at Boisar that why Gujarat inspectors are helpless
गुजरातच्या निरीक्षकांची लाचारी का पत्करतात? उद्धव ठाकरे यांचा बोईसर येथे सवाल
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Pune Burglary attempted, Sadashiv Peth Burglary,
पुणे : सदाशिव पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न, महिलेला धक्का देऊन चोरटा पसार
After Diwali municipalitys secondary division school timings changed again
माध्यमिक शाळांच्या वेळेत दिवाळी सुट्टीनंतर बदल, माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणेच सकाळी ८ ते २ या वेळेत

हेही वाचा – Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधायची कधी? मुहूर्तावरून संभ्रम

हेही वाचा – खळबळजनक..! वीज प्रवाह सोडून तीन बिबट्यांची शिकार; वनविभाग म्हणते..

आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडून आंदोलनातील शेतकरी बांधवांच्या रात्री जेवणाची सोय करण्यात आली होती. आज मंगळवारीपण हे आंदोलन तसेच सुरू राहणार असल्याची माहिती या ठीय्या आंदोलनातील शेतकरी भानुदास राणे यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली.