शेतात जाण्याचा रस्ता अन्य एका शेतकऱ्याने तारेचे कुंपण घालून बंद केला. याप्ररकणी अप्पर आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगनादेश दिल्यानंतरही हा रस्ता मोकळा करून देण्यात आला नाही. त्यामुळे एका शेतकऱ्याने आर्णी तहसील प्रशासनाच्या विरोधात चक्क शेतातच उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास चार दिवस उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे.

हेही वाचा- निमंत्रण देऊनही भाजपा नेत्यांची कार्यक्रमाकडे पाठ; अखेर नाराज भटके विमुक्त बांधवांनी उचलले ‘हे’ पाऊल

आर्णी तालुक्यातील जांब येथील शेतकरी जितेंद्र राऊत यांच्या शेतात ये-जा करण्याकरिता असलेला पांदण रस्ता सुनील ठोकळ या शेतकऱ्याने दोन महिन्यांपासून तारकुंपण घालून बंद केला. हा वहिवाटीचा रस्ता नसल्याने तो बंद केल्याचे ठोकळ सांगत आहे. शेतात जायला रस्ता नसल्याने जितेंद्र राऊत या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. मात्र, सुनील ठोकळ यांच्या बाजूने निर्णय दिला लागल्याने ४ ऑक्टोबरला राऊत यांनी अप्पर आयुक्त अमरावती येथे अपील दखल केले होती. बाजू ऐकून घेत अप्पर आयुक्तांनी ३० डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे, तरीही शेतात जाण्याचा रस्ता बंद ठेवल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. आर्णी येथील तहसीलदारांनी हा रस्ता खुला करून न देता अप्पर आयुक्त अमरावती यांच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोपही शेतकरी जितेंद्र राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा- चंद्रपूर : भन्नाट! आता वृक्षच देणार स्वत:बद्दलची माहिती

दरम्यान, नायब तहसीलदार दिलीप कडासने यांनी शेतात भेट देऊन उपोषणकर्त्याची समजूत काढण्याच प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत रस्ता खुला करणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. चार दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकरी शेतात उपोषणास बसल्याने त्याची प्रकृती खालवत आहे.

Story img Loader