अकोला : युरिया खत उपलब्ध होत नसून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. जिल्ह्यात खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे युरिया खताचा पुरवठा करण्यात यावा, आवश्यक साठा उपलब्ध ठेवून कृषी विभागाने कोणतीही कुचराई करू नये, खताचे महिनानिहाय नियोजन करून कृत्रिम टंचाईवर नियंत्रण ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात यंदा उशिरा पेरणी झाली. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात पाऊस दडी मारून बसला असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला. खरीप पिकांची निगा राखण्यासाठी शेतकरी जोमाने कामाला लागले. युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकऱ्यांना युरियाच्या कृत्रिम टंचाईचा देखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांच्याकडून आढावा घेत राज्याच्या कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. युरिया खताचा साठा व शेतकऱ्यांची मागणी याबाबत आढावा घेतला.
हेही वाचा : नागपूर : कन्हान नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरू
अकोला जिल्ह्यातील मागणीनुसार दोन दिवसात १ हजार मेट्रिक टन युरिया खताची आवक झालेली असून ३५० मेट्रीक टन युरिया खताचा राखीव साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता जाणवणार नाही, अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली. सावरकर यांनी खत उत्पादक कंपन्यांकडून मंजूर उपलब्धतेनुसार खताचा पुरवठा होत नसल्यास त्या खत कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनासुद्धा दिल्या आहेत. युरिया खताची कृत्रिम टंचाई भासत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत असल्याने त्याची चौकशी करण्यात यावी. शेतकऱ्यांची युरिया खतासाठी सातत्याने होत असलेली मागणी, खतपुरवठा व खरीप हंगामातील युरिया खताच्या महिनानिहाय मागणीचे कटाक्षाने नियोजन करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत कुचराई खपवून घेण्यात येणार नाही, असा इशारा सावरकर यांनी दिला.
हेही वाचा : तलाठ्यांनो, नव्या भरतीपर्यंत उपस्थितीचे वेळापत्रक लावा, शासनाचा आदेश
तीन हजार मेट्रीक टन साठा उपलब्ध होणार
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता भासू नये, यासाठी युरिया खताचा सुमारे तीन हजार मेट्रीक टन खताचा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी कृषी संचालक (कृषी निविष्ठा) पुणे यांच्याकडे आमदार रणधीर सावरकर यांनी दूरध्वनीवरून चर्चा करून केली. तो साठा लवकरच उपलब्ध होणार आहे.