लोकसत्ता टीम

वर्धा : आर्थिक विकासाचा दूत म्हणून महामार्ग बांधणी होत असते. जलद व सुरक्षित वाहतूक साध्य झाल्यास प्रगतीचा आलेख उंचावतो, असे शासन सांगत असते. समृद्धी महामार्ग बांधतांना अशीच आकडेवारी सांगण्यात आली होती. मात्र, हा समृद्धीकडे की मृत्युंकडे नेणारा मार्ग, अशी टीका या मार्गावर घडलेल्या अनेक अपघातांमुळे सुरू झाल्याचे वास्तव आहे.

Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
holiday rush leads to traffic congestion on highway in maharashtra
सुट्ट्यांमुळे महाकोंडी; सर्वच महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी, खंडाळा घाटात १०-१२ किलोमीटरपर्यंत रांगा
khambataki ghat tunnel work loksatta news
खंबाटकी घाटातील नवीन बोगदा अंतिम टप्प्यात, पुणे – बंगळूरू महामार्गाचे दळणवळण होणार गतिमान
butibori flyover latest marathi news
गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा

आता हा मार्ग ज्या सेलू तालुक्यातून गेला, त्या परिसरातील शेतकरी चांगलेच त्रस्त झाल्याचे अनुभव पुढे आले आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या ते पुरेसा मोबदला मिळाला म्हणून समाधानी असले तरी ज्यांच्या शेतापासून मार्ग गेला ते विविध अडचणींना सामोरे जात आहेत. समृद्धीची २०१८ मध्ये निर्मिती झाल्यानंतर शेतकरी बाधित झाले. मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. पण त्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नाही. मग हे पाणी लगतच्या शेतात घुसते. आणि शेतांचे तलाव होत असल्याचे आजचे चित्र आहे.

आणखी वाचा-नागपूर : कानाला मोबाईल अन् हातात कारचे स्टेअरिंग, महिलेने तिघांना उडवले

मार्गाचे बांधकाम होत असतांना आधी असलेल्या पोच मार्ग व पांधन रस्त्याची विल्हेवाट लागली. परिणामी अनेकांना आता स्वतःच्याच शेतात जाणे अडचणीचे ठरले. नाल्यांचे मार्ग बदलण्यात आले. तर मार्गालगत नाल्या काढण्यात नं आल्याने पाणी निघत नाही. आजूबाजूस पसरते. गोंदापूर, कान्हापूर, मोहनापूर, इटाला, महाबळा, आमगाव, खडकी, सेलडोह, खडकी, महाकाळ, बाभुळगाव, या गावातील शेकडो शेतकरी आता समृद्धीच्या नावे बोटं मोडत आहे. अशोक कलोडे, विजय खोडे, गंगाधर मुडे, मंगेश रंगारी आदी समस्याग्रस्त गावातील शेतकरी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे तक्रारी घेऊन जात आहे.

कारण कंपनी अधिकारी त्यांचे ऐकून घेत नाही. म्हणून यावर तोडगा काढण्यासाठी आ. भोयर यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.त्यात समृद्धीचे भूसंपादन अधिकारी निशिकांत सुके, रस्ते विकास मंडळाचे अभियंता मालखंदारे, कंत्राटदार ऍपकॉन कंपनीचे रणदिवे व चतुर्वेदी सहभागी होते. समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राहुल करंडे यांच्या अध्यक्षतेतील समिती आता समस्याग्रस्त गावांची मोका पाहणी करणार. शेतात साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी तसेच पुन्हा पाणी शेतात शिरू नये म्हणून उपाय करण्याची सूचना आमदारांनी केली. या समितीत शेतकरी प्रतिनिधी राहणार असून पाहणीवेळी संबंधित गावातील शेतकऱ्यांना बोलावण्याचे निर्देश आहेत.

आणखी वाचा-स्कूलबस रेल्वे रुळावर अडकली.. अन् समोरून भरधाव रेल्वे आली… समयसूचकतेने अनर्थ टळला

दरम्यान त्रस्त गावातील राजू लोणकर, अमोल जांबुतकर, यशवंत वांदिले, संदीप बजाईत, अमित उमाटे, मंगेश चांभारे, रामचंद्र भवारकर, दयाशंकर चांभारे, पुरुषोत्तम बजाईत, संजय पोहाणे, केशव चांभारे, सुरेश देशमुख, शोभाबाई चांभारे, मयूर चांभारे, गणेश पोहाणे, संजय लंगडे, मनोहर लंगडे, विलास सत्यकार, नितीन बोरकर, शुभम येळणे व अन्य शेतकऱ्यांनी आता पिकात पाणी साचल्याने झालेली हानी कोण भरून देणार, असा सवाल केला आहे.

Story img Loader