बुलढाणा : पोलीस कारवाई टाळण्यासाठी भूमिगत झालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी राजूर घाटातून आज, गुरुवारी संध्याकाळी उशिरा ताब्यात घेतले. त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाण्यासमोर तुपकरांचे कार्यकर्ते जमले असून घोषणाबाजी करीत असल्याने तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> महाराष्‍ट्रात पराभवाच्‍या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार राज्यात; काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोलेंची टीका

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…

१९ जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकात आयोजित ‘रेल्वे रोको’साठी जाताना पोलिसांनी राजुर घाटातून रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले. संभाव्य कारवाई लक्षत घेता भूमिगत झालेले रविकांत तुपकर नवीन वाहनातून संध्याकाळी मलकापूरकडे रवाना झाले होते. बुलढाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटात बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना पावणेआठ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांना कडेकोट बंदोबस्तात शहर ठाण्यात आणण्यात आले. याची वार्ता पसरताच कार्यकर्ते ठाण्यासमोर जमा झाले. त्यांनी घोषणबाजी सुरू केल्याने तणाव निर्माण झाला.

रविकांत तुपकर यांना आजची रात्र ठाण्यातच काढावी लागेल, अशी शक्यता आहे. कलम १५१ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल, असे बोलले जात आहे.

आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव

आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव असून पोलिसांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे, असा आरोप रविकांत तुपकरांनी यावेळी केला आहे. मला अटक केली तरी माझे कार्यकर्ते आणि शेतकरी उद्याचे रेल्वे रोको आंदोलन पूर्ण करतीलच, असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले.