लोकसत्ता टीम
बुलढाणा : राज्यासह देशातील शेतकऱ्यांना त्रस्त करणारी शेतमाल निर्यातबंदी कायमची बंद करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना (शरद जोशी) आग्रही आहे. या मागणीकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, गुरुवारी संघटनेच्या वतीने राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात आले.
आणखी वाचा-राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली हे सांगायला लावू नका? किशोरी पेडणेकर यांचा इशारा
बुलढाण्यात जिल्हा कचेरी समोर संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने ठिय्या देण्यात आला. शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी, सक्तीची कर्जवसुली बंद करावी, शेतीसाठी पूर्ण वेळ वीज पुरवठा, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, विम्याचा योग्य लाभ मिळण्यासाठी योजना तयार करावी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी या प्रमुख मागण्यासाठी हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. बुलडाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलकांनी निदर्शने केली. देविदास कणखर, शाहीर हरिदास खांडेभराड, विलास मुजमुले, आत्माराम तायडे, गणेश घूबे, दत्तात्रय घुबे, अर्जुन जाधव, दामोधर शर्मा, नामदेव जाधव आदी पदाधिकारी यात सहभागी झाले