नाफेड’मार्फत हरभरा खरेदीसाठी पणन महासंघाने आजपासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू केली आहे. गेल्‍या अनेक दिवसांपासून सरकारी खरेदीच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर प्रचंड गर्दी केली. धामणगाव रेल्‍वे येथील खरेदी विक्री संघाच्‍या आवारात शेतकऱ्यांनी काल सायंकाळपासूनच रांगा लावल्‍या. रात्रभर हे शेतकरी रांगेत होते. जिल्‍ह्यातील इतर केंद्रांवरही झुंबड उडाल्‍याचे चित्र होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- वर्धा : पंतप्रधानांच्या गतीशक्ती योजनेमुळे रुपडे पालटणार; ‘ही’ रेल्वे स्थानके होणार चकाचक

केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी पाच हजार ३३५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे, तर सध्या बाजारात साडेचार हजार ते ४ हजार ९०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदी करण्याची मागणी करण्‍यात येत होती. मागील वर्षी मुदतीपूर्वीच खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा पडून होता. त्यानंतर वाढीव उद्दिष्ट देण्यात आले होते, तरीही शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकला नव्‍हता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हरभरा क्षेत्र वाढल्याने उत्पादनातही वाढ झाली आहे. परिणामी दरात समतोल राहण्यासाठी ‘नाफेड’मार्फत हरभरा खरेदी करावी, अशी शेतकरी मागणी करीत होते.

हेही वाचा- ‘आनंदाचा शिधा’ : दिवाळीचा अनुभव गुडीपाडव्याला नको, काय म्हणतात शिधापत्रिका धारक

धामणगाव येथे शेतकऱ्यांच्या रांगा पाहून काँग्रेस‎चे तालुका अध्यक्ष पंकज वानखडे, पंचायत समिती‎ सदस्य शुभम भोंगे, गुंजी येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच विनीत टाले आदींनी‎ तत्काळ सोसायटी परिसरात धाव घेऊन‎ शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली तसेच‎ पिण्याचा पाण्याची व्यवस्था केली. दरम्यान, जवळच असलेल्या‎ शुभम भोंगे यांच्या घरी खिचडी शिजवून‎ गरजूंना जेवणही दिले.‎

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers thronged purchase centers to register purchase of gram in amravati mma 73 dpj