वर्धा: खरिपाचा शेतमाल विकून रब्बी हंगामासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांची आता कृषी व्यावसायिकांनी राज्यव्यापी संप पुकारल्याने कोंडी झाली आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या पाच विधेयका विरोधात हा संप असल्याचे संघटना नेते मनोज भुतडा म्हणाले. या विधेयकातील तरतुदी कृषी विक्रेत्यांसाठी अडचणीच्या आहेत.
विक्रेत्यांना सीलबंद तसेच पॅकिंग केलेल्या कृषी निविष्ठांच्या दर्जाबाबत दोषी धरण्यात येवू नये, असे म्हणणे आहे. या विधेयकाचा फेरविचार करावा म्हणून संघटनेने मुख्यमंत्री तसेच अन्य वरिष्ठांना विनंती केली होती. पण दखल घेतली गेली नाही.
हेही वाचा… गडचिरोली पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या
म्हणून हा राज्यव्यापी तीन दिवस संप पुकारण्यात आल्याचे संघटना नेते अभिलाष गुप्ता, उमेश मुंदडा, रमेश कोठारी, नरेंद्र पाटील, श्रीकांत काशीकर, रवी शेंडे, महेश राठी, विनीत बदनोरे, गणेश चांडक, सिझवान शेख, हणमंत मदान आदींनी स्पष्ट केले. या संपामुळे जिल्ह्यातील एक हजारावर कृषी केंद्र बंद राहणार आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार. कारण आता त्यांची रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली आहे.