एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी मंगळवारपासून सेवा शक्ती संघर्ष कर्मचारी संघ बेमुदत उपोषण करणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे शासकीय सवेत विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठीू ऑक्टोंबर २०२१ मध्ये बेमुदत संप पुकारला होता. यावेळी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनातील सर्वपक्षीय बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगासह एकूण १६ मागण्यांवर चर्चा झाली.

या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले गेले. परंतु पुढे त्यावर काहीच झाले नाही. त्यामुळे या मागण्यांसाठी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत ( माजी मंत्री ) सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी २० डिसेंबरपासून आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. हे उपोषण सकाळी १० वाजता यशवंत स्टेडियम परिसरात सुरू होणार आहे.

Story img Loader