गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायतजवळ अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात पादचाऱ्यासह २ जण ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. मुकरू गोमसकार (५५ रा.मुरखळा) असे मृत पादचाऱ्याचे नाव असून एकाची ओळख पटलेली नाही.

हेही वाचा – नागपूर : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एकाच कुटुंबातील तिघे ठार, सुदैवाने मुलगा बचावला

hit and run case
नागपुरात आणखी एक ‘हिट अँड रन’, पहाटे घडला थरार…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Two dies in car accident in Jalgaon district
जळगाव जिल्ह्यातील मोटार अपघातात दोन जणांचा मृत्यू
terrible accident occurred today on Samriddhi Highway in Karanja Washim district
‘समृद्धी’वरील अपघाताचे सत्र थांबता थांबेना; कारची ट्रकला धडक, चालक ठार
Bike rider along with two passengers in car died on spot
एक वेळ, एक ठिकाण अन् ३ सेकंदात दोघांचा मृत्यू; बाईकची स्कॉर्पिओला धडक पण चूक नक्की कुणाची? पाहा VIDEO
Tesla Car Accident
Tesla Car Accident : टेस्ला कारचा भीषण अपघात, अपघातानंतर गाडीला लागली आग; चार जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?
motor-tempo accident natepute, accident natepute
सोलापूर : नातेपुतेजवळ मोटार-टेम्पो अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू, तिघे जखमी
MP son car hit two-wheeler, Mumbai,
मुंबई : खासदार पुत्राच्या मोटरगाडीची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी, गणेश हंडोरे अटकेत

सूरजागड येथे लोह खनिजाची वाहतूक करणारा ट्रकचालक पिंटू मजोके किसाननगर येथे घरी जाण्यासाठी निघाला होता. वाटेत व्याहाड येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या एका प्रवाशाला गाडीत बसवले. दरम्यान सकाळी ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील मुरखळा ग्रामपंचायतजवळ ट्रकसमोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला. यावेळी ट्रकने ग्रामपंचायत समोरील स्मारकाला धडक दिली. यात मुरखळा येथील रहिवासी मुकरू गोमसकार यांचा व ट्रकमध्ये बसलेल्या अनोळखी प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक पिंटू मजोके हा गंभीर जखमी झाला आहे. अनोळखी प्रवाशाचा मृतदेह गाडीत अडकला होता. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.