अमरावती : अमरावती – दर्यापूर ते अंजनगाव सुर्जी मार्गावर इटकी फाट्यानजीक सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लग्नावरून परत येताना दोन वाहनात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत.
जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंजनगाव दर्यापूर मार्गांवरील इटकी फाट्यावर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत टेम्पोतील पाच प्रवासी ठार झाले.शेख अझहर शेख अन्वर (३५), नासिया परवीन शेख अझहर (३०), व अन्सारा परवीन शेख अझहर (९)यांचा मृतांत समावेश आहे. दर्यापूर च्या टाटानगर येथील शेख एजाज शेख अब्बास हे कुटुंबासह अंजनगाव येथून मुलीच्या दिराच्या लग्नाच्या निमित्ताने झालेला वलिमा आटोपून एका पीकअप टेम्पोने एकूण १३ जण अंजनगावहून दर्यापूरकडे निघाले.
हेही वाचा >>>दक्षिण नागपुरात वीज संकट, कधीही पुरवठा खंडित होण्याचा धोका, काय आहे कारण?
इटकी फाट्याजवळ टेम्पोला ट्रकने धडक दिली. यात अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. वाहतूक शाखा निरीक्षक गोपाल उंबरकर व खल्लारचे ठाणेदार तातडीने घटनास्थळी पोहोचले आहे. दरम्यान अमरावतीच्या इर्वीन हॉस्पिटलमध्ये दोघे दगवल्याने मृतांची संख्या पाच झाली. गंभीर जखमी असलेल्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि पीडीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहे.