वर्धा : आज पोळ्याची ग्रामीण भागात धुमधाम असतानाच गुंजखेडा गावात मात्र शोककळा पसरली आहे.देवळी तालुक्यातील या गावात दुर्घटना घडली. येथील राजू पुंडलिकराव राऊत हे मुलगा चंद्रकांत सोबत याच परिसरात असलेल्या एका तलावावर बैलजोड़ी धुण्यास गेले होते. बैल धुत असतानाच वडिलांचा तोल गेला. ते घसरून पाण्यात पडले.
ते तलावात बुडत असल्याचे दिसून येताच मुलगा चंद्रकांत वडिलांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, खोलवर पाण्याचा दोघांनाही अंदाज आला नाही. ते पाण्यात बुडाल्याने त्यांचा जागीच अंत झाला. या प्रकरणी पुलगाव पोलीसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.