नागपूर: “शासन आपल्या दारी”  उपक्रमाव्दारे सरकार लोकांपर्यंत जाण्याचा दावा करीत आहे तर उध्दव ठाकरे यांनी ” शासन आपल्या दारी, सरकार थापा मारते लय भारी ” अशी टीका केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कांद्री येथे घर पडून बाप- लेकीचा मृत्यू झाला.पण अद्याप त्यांच्याकडे पालकमंत्री पोहचले ना जिल्हाधिकारी. सरकार त्यांच्या दारापासून दूरच आहे.उध्दव ठाकरे बोलतात तेच खरे याचा प्रत्यय कांद्रीवासीयांना आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> गोंदिया : इटियाडोह प्रकल्पचा साठा यंदा ८३ टक्क्यांवरच

नागपूर जिल्ह्यातील कन्हान कांद्री येथे मागच्या आठवड्यात  अचानक घर कोसळून,कमलेश गजानन कोठकर व त्यांची ५ वर्षाची मुलगी यादवी कोठकर यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे  परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर घर ,या भागात वेकोलीव्दारे कोळसा उत्खननासाठी करण्यात येणाऱ्या स्फोटामुळे पडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. यावरून जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे.  येथे एका घरातील दोन जीव  गेले आहे.अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी घटनास्थळास भेट देऊन, मृतकांच्या नातेवाईकांचे सांत्वन करणे अपेक्षित होते..परंतु येथे ना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. ना नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन, परिस्थिती समजावून घेतली.

हेही वाचा >>> जालना, संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या बस फेऱ्या रद्द, वाशिम आगाराला दररोज दोन लाखांचा तोटा, प्रवासी त्रस्त

या घटनेनंतर पालकमंत्री दोन वेळा नागपूरला खाजगी कार्यक्रमा करिता येऊन गेले आहे. ही गोष्ट प्रशासनाने त्यांच्या नाही दर्शनास आणून दिली नाही काय?असा येथे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सदर दुर्घटना घडली त्यावेळी खदान मध्ये स्फोट करण्यात आले नव्हते. त्यामुळे स्फोटामुळे घर पडले असे म्हणता येणार नाही, अशी भूमिका घेत डब्ल्यू सी एल ने आपली जबाबदारी झटकली. ही नैसर्गिक आपत्ती नाही म्हणून जिल्हा प्रशासन तांत्रिक मुद्द्याचा आधार घेऊन,दुर्लक्ष करीत आहे. आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळास,पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी भेट तर दिली नाहीच,शिवाय या भागाचे आमदार, रामटेकचे खासदार ,भाजपचे प्रांताध्यक्ष विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावणकुळे यांना ही येथे भेट देण्यासाठी वेळ मिळाला नाही.माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक यांनी मात्र घटनास्थळास भेट देऊन,म्रुतकाचे नातेवाईकांचे सांत्वन केले.