वाशीम : मालेगाव शहरात चार दिवसापूर्वी खताच्या पोत्यात कुजलेल्या अवस्थेत मानवी शरीराचे तुकडे पोलिसांना आढळून आले होते. याचा शोध घेत असताना धक्कादायक प्रकार समोर आला असून निर्दयी बापानेच पोटच्या लेकीला ठार करून तिच्या शरीराचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने खताच्या पोत्यात टाकून नालीत फेकून दिले होते. या प्रकरणी निर्दयी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मालेगाव शहरातून इरळा गावाकडे जाणाऱ्या पांदन रस्त्याजवळील नाल्याजवळ खताच्या गोणीत कुजलेल्या अवस्थेत मानवी शरीराचे तुकडे आढळून आल्याची घटना १९ मे रोजी समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु पाच दिवसात पोलिसांनी प्रकरणाचा शोध घेऊन आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर: रावत गोळीबार प्रकरणाचा उलगडा; काँग्रेस समर्थित दोन भावंडांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

मुलगी मंदबुद्धी असल्याने बापानेच तिचा खून केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात मुख्तार खा मोहम्मद खा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.